डीएफसी श्रावणी संघाने जिंकली लिजंड्स लीग ट्रॉफी 

  • By admin
  • March 24, 2025
  • 0
  • 175 Views
Spread the love

अंतिम सामन्यात नॉन स्ट्रायकर्स संघावर ३५ धावांनी विजय

अमान शेख, निलेश गवईची लक्षवेधक कामगिरी 

छत्रपती संभाजीनगर ः लिजंड्स प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत डीएफसी श्रावणी संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात डीएफसी श्रावणी संघाने नॉन स्ट्रायकर्स संघावर ३५ धावांनी सुरेख विजय साकारला.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर या स्पर्धेचा रविवारी शानदार समारोप झाला. अंतिम सामन्यात डीएफसी श्रावणी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि २० षटकात सहा बाद २२२ अशी भक्कम धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात नॉन स्ट्रायकर्स संघ १७ षटकात १८७ धावांवर सर्वबाद झाला. डीएफसी श्रावणी संघाने ३५ धावांनी सामना जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 

या सामन्यात डीएफसी संघाच्या अमान शेख याने तुफानी फलंदाजी केली. त्याने अवघ्या ३२ धावांत नाबाद ९२ धावा फटकावत सामन्याचे चित्र बदलून टाकले. अमान याने तब्बल नऊ षटकार ठोकले आणि सात चौकार मारत मैदान गाजवले. इशांत राय याने ३५ चेंडूत ६१ धावांची वादळी फलंदाजी केली. इशांत याने सात टोलेजंग षटकार व दोन चौकार मारले. लहू लोहार याने २८ चेंडूत ५३ धावा फटकावत सामना थोडा चुरशीचा बनवला. त्याने तीन षटकार व सहा चौकार मारले.

निलेश गवईची घातक गोलंदाजी

गोलंदाजीत डीएफसी श्रावणी संघाच्या निलेश गवई याने घातक गोलंदाजी केली. निलेश याने ३० धावांत पाच विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. राजेश शिंदे याने २७ धावांत तीन विकेट घेतल्या. इशांत राय याने २१ धावांत दोन गडी बाद करुन अष्टपैलू कामगिरी बजावली.


स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू
 
मालिकावीर ः शेख सादिक
फलंदाज ः अशोक शिंदे
गोलंदाज ः निलेश गवई
फायटर ऑफ द फायनल ः राजेश शिंदे
अंतिम सामना सामनावीर ः अमान शेख

पारितोषिक वितरण सोहळा
 
लिजंड्स प्रीमियर लीग स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत, आयपीएस नितीन बगाटे, विशाल कदम, दर्शन सेठिया, विशाल सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्य संयोजक अलोक खांबेकर यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले.  

संक्षिप्त धावफलक ः डीएफसी श्रावणी संघ ः २० षटकात सहा बाद २२२ (पंकज १८, इशांत राय ६१, तनवीर राजपूत ६, अशोक शिंदे ८, दादासाहेब १३, अमान शेख नाबाद ९२, निकित चौधरी नाबाद १३, इतर ११, राजेश शिंदे ३-२७, अमोल दौड १-१५, शेख सादिक १-४१, आसिफ खान १-४७) विजयी विरुद्ध नॉन स्ट्रायकर्स संघ ः १७ षटकात सर्वबाद १८७ (सिद्धांत पटवर्धन १३, आसिफ खान ५०, शेख सादिक ७, अमोल दौड ५, लहू लोहार ५३, राजेश शिंदे ४३, नेताजी साप्ते नाबाद ५, निलेश गवई ५-३०, इशांत राय २-२१, तनवीर राजपूत १-५४, अमान शेख १-४९, पंकज १-३१). 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *