
पुणे ः कोकणस्थ परिवार पुणेचे ज्येष्ठ संस्थापक स्वर्गीय नारायण उर्फ काका दरिपकर यांच्या ८९व्या जयंती निमित्त राष्ट्रीय अंध कबड्डीपटू संदीप जाधव याचा खास सत्कार क्रीडा संघटक सुनील नेवरेकर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला.
नेहरू स्टेडियम, पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी विशाल पाटील हे होते. संदीप जाधव दिल्ली, कर्नाटक, मुंबई येथील राष्ट्रीय अंध कबड्डी स्पर्धेत भाग घेतला आहे. मुळचा सातारचा असलेला संदीप जाधव शिक्षणासाठी पुण्यात आला असून पदवीधर होऊन सध्या बँकेच्या परीक्षेचा अभ्यास करत आहे. विजय लांबतुरे यांनी स्वागत केले. रोहित भरगुणे यांनी प्रास्ताविक केले, पूनम सोनवणे यांनी आभार मानले. वैभव मांढरे यांनी सूत्रसंचालन केले.