
आयोजक राहुल पाटील, संदीप जाधव यांची घोषणा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात प्रथमच १४ वर्षांखालील मुला-मुलींसाठी टी २० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. येत्या सात मेपासून ही टी २० क्रिकेट स्पर्धा गरवारे क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक राहुल पाटील व जाधव क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक संदीप जाधव यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. अंडर १४ गटात मुला-मुलींसाठी टी २० क्रिकेट स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया लवकरच होणार आहे. या स्पर्धेचे यूट्युबवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंनी (मुले-मुली) आपला सहभाग फॉर्म भरुन नाव नोंदणी करावी. या स्पर्धेत अधिकाधिक मुला-मुलींनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक राहुल पाटील व संदीप जाधव यांनी केले आहे.
Add