नांदेड भूषण क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत

  • By admin
  • June 17, 2025
  • 1
  • 124 Views
Spread the love

सरदार जसविंदरसिंग रामगडिया, राहुल वाघमारे यांचे आवाहन

नांदेड ः क्रीडा क्षेत्रात उल्लेखणीय कामगीरी करणाऱ्यांसाठी नांदेड ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार येत्या २९ जून रोजी वितरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ऑलिम्पिक संघटनेला सलग्न असणाऱ्या खेळाच्या खेळाडूंनी, प्रशिक्षकांनी व क्रीडा संघटक यांनी आपले प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष सरदार जसविंदरसिंग रामगडिया व महासचिव डॉ राहुल वाघमारे यांनी केले आहे.

सदरील पुरस्कार हा जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक व खेळाडू यांच्या कार्याचे योगदानाचे मूल्यमापन व्हावे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा त्यांचे कार्य पाहून इतरांनीही प्रेरणा मिळावी या हेतूने नांदेड भूषण गुणवंत क्रीडा संघटक, नांदेड भूषण गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, महिला/पुरुष व नांदेड भूषण गुणवंत खेळाडू महिला/पुरुष असे पाच पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यात रोख रक्कम ११ हजार रुपये सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

संघटक पुरस्कारासाठी मागील पाच वर्षांत विविध खेळाच्या स्पर्धा आयोजन, चर्चासत्रे, मैदान बनविणे, खेळाबाबत वर्तमानपत्रात लिखाण, खेळाबाबत रेडिओ, टीव्हीवर मुलाखत या कार्याचा विचार होणार आहे. तर क्रीडा मार्गदर्शकाने मागील पाच वर्षांत वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू तयार केले असतील तर अर्ज करू शकतात तसेच नांदेड भूषण गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी मागील पाच वर्षांतील वरिष्ठ गटात केलेली राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी ग्राह्य धरण्यात येईल. त्यामध्ये सांघिक अथवा वैयक्तिक मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल गेम, वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा, खेलो इंडिया मान्यता प्राप्त, वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धा ग्राह्य धरण्यात येतील. खेळाडू पुरस्कार करिता भारतीय ऑलिम्पिक खेळात समावेश असणाऱ्या खेळांच्या तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेस संलग्न असणाऱ्या खेळाच्या संघटनेचे संघटक मार्गदर्शक खेळाडूंनी अर्ज करावेत.

खेळाडू पुरस्काराकरिता अॅथलेटिक्स, आर्चरी, बास्केटबॉल, सायकलिंग, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, बॉक्सिंग, लॉन टेनिस, नेमबाजी, हॉकी, बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, कॅनोईंग कयाकिंग, क्रिकेट, जलतरण, डायव्हिंग, वॉटरपोलो, ट्रायथलॉन, बॉडी बिल्डिंग, कुस्ती, स्केटिंग, बेसबॉल, रोईंग, स्क्वॉश, टेबल टेनिस, तायक्वांदो, कबड्डी, खो-खो, वेटलिफ्टिंग, मल्लखांब, आट्यापाट्या, बुद्धिबळ, बिलियर्ड्स अँड स्नुकर, याटिंग इत्यादी खेळांचा समावेश आहे. इच्छुक क्रीडा संघटक, क्रीडा मार्गदर्शक खेळाडू यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज १९ जून पासून २३ जूनपर्यंत ऑलिम्पिक संघटनेचे कार्यालय, शांती गार्डन, पारस नगर येथे सादर करावेत.

अर्ज प्राप्त करण्याकरिता ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक बालाजी जोगदंड (7020815826), महासचिव डॉ राहुल वाघमारे (8055380258) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेचे चेअरमन शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गुपीले, कार्याध्यक्ष प्रलोभ कुलकर्णी, डॉ रमेश नांदेडकर, कोषाध्यक्ष प्रा जयपाल रेड्डी, विक्रांत खेडकर, विनोद गोस्वामी, टी एन रामन बैनवाड, डॉ दिनकर हंबर्डे, डॉ राजेश जांबळे, प्रा वृषाली पाटील जोगदंड, डॉ कळमसे, बाबुराव खंदारे, विनोद जमदाडे, कुलदीप सिंग जाट, बंटी सोनसळे, राष्ट्रपाल नरवाडे यांनी केले आहे.

1 comment on “नांदेड भूषण क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत

Leave a Reply to Ananda kamble Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *