< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); बीसीसीआयतर्फे देशांतर्गत स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, अनेक बदल – Sport Splus

बीसीसीआयतर्फे देशांतर्गत स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, अनेक बदल

  • By admin
  • June 17, 2025
  • 1
  • 501 Views
Spread the love

रणजी ट्रॉफी ते सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचे स्वरूप बदलले

मुंबई ः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२५-२६ च्या रणजी ट्रॉफीचे सुधारित स्वरूप जाहीर केले आहे. ही स्पर्धा आता दोन टप्प्यात खेळवली जाईल. पहिला टप्पा १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर आणि दुसरा टप्पा २२ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान. नॉकआउट सामने ६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान खेळवले जातील.

बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला की आता एका संघाला बढती दिली जाईल आणि एका संघाला प्लेट गटातून खाली टाकण्यात येईल. यापूर्वी, दोन संघांना बढती आणि खाली टाकण्यात आले होते. हा नियम आता सर्व बहु-दिवसीय स्पर्धांना लागू होईल – वरिष्ठ आणि कनिष्ठ दोन्ही.

संघांची गुणवत्ता विचारात घेतली जाणार 
२०१८-१९ पासून रणजी करंडकात नऊ नवीन संघांचा समावेश करण्यात आला, ज्यामध्ये ईशान्येकडील संघांचा समावेश होता. तथापि, याचा स्पर्धेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. उदाहरणार्थ, मेघालय संघाने गेल्या हंगामात एलिट डिव्हिजनमध्ये भाग घेतला होता, परंतु सर्व सामने गमावले.

इतर प्रमुख देशांतर्गत स्पर्धेचे वेळापत्रक

दुलीप करंडक : २८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर.

इराणी करंडक : १ ते ५ ऑक्टोबर

सय्यद मुश्ताक अली करंडक (टी २० स्पर्धा) : २६ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर

या स्पर्धेत आता प्लेट डिव्हिजन पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

अव्वल संघांना आता नॉकआउटपूर्वी सुपर लीग फेरीअंतर्गत तीन अतिरिक्त सामने मिळतील.

गट अ आणि ब मधील अव्वल संघ अंतिम फेरीत भिडतील.

पात्रता फेरी नेट रन रेटने ठरवली जाईल

सर्व व्हाईट बॉल स्पर्धांमध्ये (एकदिवसीय आणि टी-२०), जर गट टप्प्यात संघांचे गुण बरोबरीत राहिले, तर बाद फेरीसाठीचा संघ नेट रन रेटच्या आधारे ठरवले जाईल.

भारत-न्यूझीलंड मालिका तात्पुरते वेळापत्रक (जानेवारी २०२६)

पहिली वनडे : ११ जानेवारी (हैदराबाद)

दुसरी वनडे : १४ जानेवारी (राजकोट)

तिसरी वनडे : १८ जानेवारी (इंदूर)

पहिला टी २० : २१ जानेवारी (नागपूर)

दुसरा टी २० : २३ जानेवारी (रांची)

तिसरा टी २० : २५ जानेवारी (गुवाहाटी)

चौथी टी २० : २८ जानेवारी (विशाखापट्टणम)

पाचवी टी २० : ३१ जानेवारी (तिरुवनंतपुरम)

भारतीय पुरुषांचे देशांतर्गत क्रिकेट वेळापत्रक

दुलीप ट्रॉफी – २८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर

इराणी कप – १ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर

रणजी करंडक – १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर (टप्पा-१)

२२ जानेवारी ते फेब्रुवारी १ (टप्पा-१)

६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी (नॉकआउट)

सय्यद मुश्ताक अली टी -२० ट्रॉफी ः २६ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर

विजय हजारे ट्रॉफी – २४ डिसेंबर ते १८ जानेवारी
कर्नल सीके नायडू ट्रॉफी – १६ ऑक्टोबर ते ०५ नोव्हेंबर (पहिला टप्पा)

२३ जानेवारी ते १६ फेब्रुवारी (टप्पा दुसरा)

६ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी (नॉकआउट)

पुरुषांची २३ वर्षांखालील राज्य ट्रॉफी – ९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर

विनू मंकड ट्रॉफी – ९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर
पुरुषांची १९ वर्षांखालील एकदिवसीय चॅलेंजर ट्रॉफी – ५ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर

कूचबिहार ट्रॉफी – १६ नोव्हेंबर ते २० जानेवारी

विजय मर्चंट ट्रॉफी – ७ डिसेंबर ते २८ जानेवारी

महिला देशांतर्गत क्रिकेट वेळापत्रक

वरिष्ठ महिला टी२० ट्रॉफी – ८ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर

वरिष्ठ महिला इंटरझोनल टी२० ट्रॉफी – ४ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर

वरिष्ठ महिला एकदिवसीय ट्रॉफी – ६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी

वरिष्ठ महिला इंटरझोनल वनडे ट्रॉफी – ६ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी

सिनियर महिला इंटरझोनल मल्टी डे ट्रॉफी – २० मार्च ते ३ एप्रिल

महिला अंडर-२३ टी-२० ट्रॉफी – २४ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर

महिला अंडर-२३ एकदिवसीय ट्रॉफी – ३ मार्च ते २२ मार्च

महिला अंडर-१९ टी-२० ट्रॉफी – २६ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर

महिला अंडर-१९ एकदिवसीय ट्रॉफी – १३ डिसेंबर ते १ जानेवारी

महिला अंडर-१५ एकदिवसीय ट्रॉफी – २ जानेवारी ते २१ जानेवारी

विझी ट्रॉफी – १ मार्च ते ७ मार्च

1 comment on “बीसीसीआयतर्फे देशांतर्गत स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, अनेक बदल

Leave a Reply to Omkar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *