
ठाणे (नामदेव पाटील) ः ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी व ठाणे महानगरपालिका क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुब्रतो मुखर्जी स्पर्धेला ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियम येथे सोमवारी प्रचंड उत्साहात सुरू झाली आहे.
बाद पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत ठाण्यातील वेगवेगळ्या शाळांमधील, मुलांच्या गटात १७ वर्षाखालील मुले ३२ संघ, मुलींच्या गटात ११ संघ व पंधरा वर्षाखालील मुले ३१ संघ अशा एकूण ७४ संघानी या स्पर्धेत भाग घेतला आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षातील पहिलीच क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी ठरेल अशी प्रतिक्रिया प्रमोद वाघमोडे यांनी उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना दिली. क्रीडा समन्वयक शंकर बरकडे यांच्या उपस्थितीत मुंबई विभाग संपर्क प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष ठाणे, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे प्रमोद वाघमाेडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी क्रीडा शिक्षक नामदेव पाटील, निखिल गावडे, अन्वर खान, स्पर्धा सहाय्यक सीमा शिंदे व अनेक शाळांमधील क्रीडाशिक्षक, तसेच फुटबॉल प्रशिक्षक उपस्थित होते. सदरची स्पर्धाही जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे सुवर्णा बारटक्के, तसेच ठाणे महानगरपालिका क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.
Good afternoon
This tournament to conduct good opportunity in player