
गोवा : गोवा येथे झालेल्या तिसऱ्या राष्ट्रीय युथ गेम्स चॅम्पियनशिप स्पर्धेत तामिळनाडू संघाने विजेतेपद पटकावले तर महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद संपादन केले.
युथ गेम्स कौन्सिल इंडिया यांच्यातर्फे गोवा येथे पेडेम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मापुसा या ठिकाणी राष्ट्रीय युथ गेम्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून पीएससीचे क्रीडा अधिकारी स्टेफी कॉर्डोझो, प्रमुख पाहुणे म्हणून सुमित सर यांनी भेट देऊन खेळाडूंची ओळख करून घेत खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
या स्पर्धेत तमिळनाडू आणि महाराष्ट्र दोन्ही संघाने सातत्याने चांगली कामगिरी करत निर्विवाद वर्चस्व राखले. विजयी संघांना युथ गेम्स कौन्सिल इंडियाचे संस्थापक आणि राष्ट्रीय सचिव राणा अमरसिंह (अमरसिंह चंदेले) यांच्या हस्ते विजयी चषक प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सचिव यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

‘क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या राज्याचा व देशाचा नावलौकिक वाढवावा. राज्याचे व देशाचे प्रतिनधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट असून या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या लोकांची संस्कृती व भाषेचा परिचय होतो व त्यातून आपल्या मध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागते. येथील सर्व विजयी खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. या स्पर्धेतून आपण निश्चितच खूप चांगल्या आठवणी घेवून जाणार आहात. ज्या संघाना संपूर्ण विजेतेपद आणि उपविजेतेपद मिळाले नाही अशा संघानी येत्या काळात अधिक सराव करून पुढील स्पर्धांमध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न करावा व खेळांच्या क्षेत्रामध्ये कठोर परिश्रम करून यशस्वी व्हावे. सर्व विजयी खेळाडू लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा खेळणार आहेत, असे युथ गेम्स कौन्सिल इंडियाचे संस्थापक आणि राष्ट्रीय सचिव राणा अमरसिंह (अमरसिंह चंदेले) यांनी सांगितले.
या कार्यक्रमास युथ गेम्स कौन्सिल इंडियाचे उपाध्यक्ष बी एच ठाकूर, सहसचिव अतुल राघव, व्यवस्थापन प्रमुख आर्यन पाठक, उत्तर विभाग समन्वयक गौरव शर्मा, दक्षिण विभाग प्रमुख गानजी सीवा, युथ गेम्स कौन्सिल महाराष्ट्रचे अध्यक्ष शंकर गायकवाड, सचिव श्रीकांत पाटील, खजिनदार निलेश वाकचौरे, उत्तर प्रदेश समन्वयक हर्ष चौधरी, कर्नाटक राज्याचे समन्वयक मरियप्पा, सह समन्वयक सिद्धार्थ सर, तमिळनाडू राज्याचे राज्य प्रमुख विघ्नेश, रितेश, उमापती कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते विजयी खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे माजी खेळाडू आणि स्वयंसेवक तसेच संलग्न राज्यांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
पदक तालिका
१.तामिळनाडू १५३ पदके (९७ सुवर्ण, ४० रौप्य, १६ कांस्य),
२. महाराष्ट्र ११९ पदके (९२ सुवर्ण, १४ रौप्य, १३ कांस्य),
३. कर्नाटक ९० पदके (७० सुवर्ण, ११ रौप्य, ९ कांस्य),
४. तेलंगणा ३९ पदके (३२ सुवर्ण, ६ रौप्य, १ कांस्य),
५. आंध्र प्रदेश १८ पदके (१४ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य).
Hai iam sutharsan ramasamy iam a Silambam coach in tamilnadu Ramanathapuram district