
मुलींच्या गटात महाराष्ट्र विजेता तर मुलांच्या गटात उपविजेता
नांदेड : नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शालेय अंडर १४ मुले-मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले. गुजरात संघ उपविजेता ठरला. तामिळनाडू संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
नांदेड जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशन व नांदेड जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ (१४ वर्षे मुले-मुली) स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे हे होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव अंकुश रक्ताडे, नांदेड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव डॉ दिनकर हंबर्डे, स्पर्धा निरीक्षक निर्मल जांगडे, पंच प्रमुख प्रवीण ठाकरे, उपायुक्त रमेश चवरे आणि इम्तियाज खान आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ राहुल श्रीरामवार यांनी केले.
आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे म्हणाले की, ‘शालेय जीवनात बुद्धिबळ हा खेळ अतिशय महत्वाचा असून शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही उल्लेखणीय कार्य करुन करिअर घडवावे व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवावी असे सांगितले.
महाराष्ट्राचे वर्चस्व
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात महाराष्ट्र संघ उपविजेता ठरला. मुलीच्या संघामध्ये निहीरा कौल, सई पाटील, पलक सोनी, ब्रितीका गमे, दिव्यांशी खंडेलवाल यांचा समावेश आहे. मुलांच्या संघात विवान सरावगी, शौनक बडोले, विक्रमादित्य चव्हाण, निहान पोहाणे, ध्रुवा पाटील या खेळाडूंचा समावेश होता. या संघाचे प्रशिक्षक म्हणून डॉ निलकंठ श्रावण, चंद्रप्रकाश होनवडजकर यांनी आपली भूमिका बजावली. संघ व्यवस्थापक म्हणून संजय बेतीवार व विपुल दापके यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कवीन, सणुश, मोतीवाल, मितांश दीक्षित, पटेल, आहान माथूर, शौनक बडोले, प्रभ मनसिंग मल्होत्रा, हरीडे मणियार, निहान पोहाने, साहिल, श्री साई वेदांश, कथिर टी, थारुणिका, अपूर्वा भोळे, पलक सोनी, अधित्री शोमे, अन्विया प्रवीण, रितिका गमे, अर्पिता पाटणकर, दिव्यश्री कोलीपरा, निहिरा कौल, दुसिका, दिना पटेल, अभिश्री दिपू, श्रुती बोला, अनुषा, हिया शर्मा यांना पारितोषिके देण्यात आली.
या स्पर्धेकरीता मुख्य पंच म्हणून प्रवीण ठाकरे यांनी काम पाहिले. पंच म्हणून अमरीश जोशी (छत्रपती संभाजीनगर), शार्दुल तापसे (सातारा), भुपेंद्र पटेल (अहमदाबाद), पल्लवी कदम (अंबेजोगाई), सुचिता हंबर्डे (नांदेड), गगनदिपसिंग रंधावा (नांदेड), शिषीर इंदुरकर (नागपूर), नथ्थू सोमवंशी (जळगाव), चैतन्य गोरवे (परभणी), सिद्धार्थ हटकर (नांदेड), प्रशांत सूर्यवंशी (नांदेड), ऋतुजा कुलकर्णी (नांदेड) आदींनी काम पाहिले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, शिवकांता देशमुख, डॉ. निलकंठ श्रावण, डॉ. राहुल श्रीरामवार, विपुल दापके, संतोष कनकावार, दत्तकुमार पुतडे, संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमत नरवाडे, आकाश भोरे, वैभव दोमकोंडवार, ज्ञानेश्वर सोनसळे, सुशील कुरुडे, कपिल सोनकांबळे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद आलेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे आदींनी पुढाकार घेतला होता.
I absolutely love your blog and find most of your post’s to be exactly
I’m looking for. Would you offer guest writers to write content available for you?
I wouldn’t mind publishing a post or elaborating on many of the subjects you write
with regards to here. Again, awesome site!
Thank you very much for your response regarding ‘Sports Plus’. If you can write something regarding the sports sector, your writing is welcome. In this regard, you can send me information on this website bbhalerao2007@gmail.com.
Great post. I was checking constantly this blog and I am impressed!
Very helpful info specially the last part 🙂 I care for such
info a lot. I was seeking this certain info for a
long time. Thank you and best of luck.
Good post. I learn something totally new and challenging on websites I stumbleupon every
day. It’s always useful to read through articles from
other writers and practice a little something from other
websites.
Thank you very much
This is my first time pay a visit at here and i
am genuinely happy to read everthing at single place.
Thank you very much
Hi there, just became alert to your blog through Google,
and found that it’s truly informative. I am going to watch out for brussels.
I will be grateful if you continue this in future. Numerous people will be benefited from your writing.
Cheers!
hank you very much
Thank you very much
Thank you very much
I always emailed this webpage post page to all my contacts, because if
like to read it after that my links will too.
Wow, marvelous weblog structure! How lengthy have you been running a blog for?
you make blogging glance easy. The whole look of your website is magnificent, let alone the content!
Thank you very much.